
मध्यप्रदेश येथून कामगारांना घेऊन एक बस लोटे येथे आली असल्याचे समजताच संतप्त ग्रामस्थांनी पुष्कर कंपनीच्या गेटवर दिली धडक
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ऑपरेशन ब्रेक द चेन साठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातुन बाहेर व जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही. असे असताना लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीच्या मजुरांची एक बस थेट मध्यप्रदेशहून कंपनीत दाखल झाली असल्याने खळबळ उडाली आहे. ३२ कामगारांना घेऊन ही बस लोटे येथे आलीच कशी ? हा प्रश्न लोटे परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
मध्यप्रदेश येथून कामगारांना घेऊन एक बस लोटे येथे आली असल्याचे समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुष्कर कंपनीच्या गेटवर धडक दिलीकडक लॉकडाऊन असल्याने एकही वाहन जिल्ह्यात न येऊ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मग ३२ कामगारांना घेहून ही बस जिल्ह्यात कशी आली . त्या ३२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना २८ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी उपस्थिती पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. कंपनी व्यवस्थापकानी आमच्या कंपनीत सकाळी ९ वाजता ३२ मजुर घेऊन ही बस आज दाखल झाली. पण आम्ही त्या मजुरांना कंपनीच्या एका सभागृहात ठेवले आहे. त्यांची मध्यप्रदेश ला आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे त्याचे म्हणणे आहे
www.konkantoday.com