
पेण शहरातील दिपक कला केंद्रांमधून १५०० गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे रवाना
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावरती कोरोनाचे सावट पसरलं होतं. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय तर रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला.अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही गणेश मूर्तिकारकारांनी हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील दिपक कला केंद्रांमधून १५०० गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठविले आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मुर्त्या विमानाने गेल्या आहेत तर दुबई थायलंडला मात्र समुद्रमार्गाने पाठवण्यात आले आहेत अशी माहिती कला केंद्राचे मालक निलेश दीपक समेळ यांनी दिली.
दरवर्षी पेण तालुक्यातून लंडन, ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशससह अनेक देशांना बाप्पाची वारी होत असते
wwww.konkantoday.com