
फेक लिंक पाठवून परस्पर ऑनलाईनवरून खात्यातील १ लाख रुपये काढून फसवणूक
रत्नागिरी शहरातील आंबेशेत कर्ला येथे राहणारे राकेश नाचणकर यांची अज्ञात व्यक्तीने ऑनलाईनद्वारे एक लाख रुपयांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी राकेश नाचणकर हे घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून मोबाईलवर एक फेक लिंक पाठवली. ती लिंक ओपन केल्यानंतर फिर्यादी यांचे बँक ऑफ महाराष्ट्रामधील बचत खात्याचे एक लाख रुपये अज्ञात इसमाने ऑनलाईन काढून त्यांची फसवणूक केली. याबाबत शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com