पुण्यातील गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकर कुराडे यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवला
कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क न घातल्यास दंड भरावा लागू शकतो. अशातच आता पुण्यातील गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकर कुराडे यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. एकीकडे सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढत होत चालली असताना, अशाप्रकारे सोन्याचा मास्क बनवल्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडचे शंकर कुराडे हे हा सोन्याचा मास्क घालून फिरतात. हा मास्क साडेपाच तोळ्यांचा आहे. हा देशातील सर्वात महागडा मास्क असण्याची देखील शक्यता आहे.
www.konkantoday.com