
भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्हयातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता
वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर (२६,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) या तरूणीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच सिताराम किर याचा ज्या ठिकाणी जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. हे दोन्ही खून सायली देशी बार येथे करण्यात आले होते. हे ठिकाण गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले. या दरम्यान भक्ती मयेकरचा मोबाईल या बारमधून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.भक्ती मयेकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्हयातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोबाईधील तिचे दुर्वाससोबत झालेले कॉल डिटेल्स, चॅटिंग तसेच सिताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लिलपणे बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहर पोलिस आता भक्ती मयेकरच्या मोबाईलचे सीडीआर तपासणार आहेत. या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. या तपासादरम्यान संशयितांविरोधात एक सबळ पुरावा मिळण्याची शक्यता आहे.




