देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा करोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करावे-गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यातील सत्ता स्थापनेला सहा महिन्यांचा काळ लोटला असला, तरी सत्ता स्थापनेच्या काळात झालेल्या चर्चांवरून नवनवे गौप्यस्फोट अधून होत आहेतदेवेंद्र फडणवीस यांनी दावा केला हाेता की, शरद पवारांनी भाजपाला ऑफर दिली होती पण खरं काय? असा प्रश्न देशमुख यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,”असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब सध्या अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरूवातीला स्वप्न पडत होती सरकारमध्ये येण्याची, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जुन्या गोष्टी काढत राहतात. करोनाच्या काळात आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे. आमचं पोलीस खातं आहे, आमचे डॉक्टर्स आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा करोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केल पाहिजे,” असं आवाहन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.
www.konkantoday.com