३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील किल्ल्यांवर गडकिल्ले संवर्धनकडून जागृतीचे काम.

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यामार्फत ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील २०३ गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक खडा पाहारा राबवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रत्नदुर्ग (भगवती किल्ला), जयगड आणि पूर्णगड या किल्ल्यांवर ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरीमार्फत हा उपक्रम बारविण्यात आला.

किल्ल्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाला ओळखून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाने खडा पहारा देण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या सदस्यंनी आणि रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने रात्रभर किल्ल्यावर कडक पहारा ठेवला. अनुचित प्रकार करणार्‍या तळीरामांना किल्ल्यावरून हाकलून लावण्यात आले. तसेच काही ठिकाणी कडक कारवाईही करण्यात आली. मोहीम राबवत असताना अनेक उपद्रवी, मद्यपी तसेच अश्‍लिल चाळे करणार्‍यांना प्रतिबंधित करण्यात आले. तसेच गडकिल्ल्यांचे महत्व पटवून देण्याचे कार्य करण्यात आले.

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपेश वारंग, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, स्नेहल बने, भूमिका चेंदरकर, संपर्क प्रमुख चिन्मय जाधव तसेच गडकिल्ले सेव सचिन देशमुख, आकाश जोगळेकर, रोहित नांदगावकर, शुभम आग्रे, अंकुर मांडवकर, गौरव बळकटे, प्रितम मांडवकर, सुजल सोळंके, सुरज खोचाडे, श्रीरंग सनगरे, मयुर भितळे, ओंकार बाणे, करण सुपल, श्रीकांत कदम आदींचा सहभाग होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर व सहकारी श्‍वेता फाळके, गीता शिंदे, आरती सावंत, धनश्री कुष्टे, गौरी कुष्टे, संचिता कदम, संजय कदम, समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था कोकण प्रांत अध्यक्ष श्रीकांत मराठे यांनी रात्रभर पहारा देवून आपले मोलाचे योगदान दिले, अशी माहिती गडकिल्ले संवर्धन समितीकडून देण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button