
नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे सहकार्यातुन निसर्ग चक्रीवादळातील नुकसान ग्रस्ताना मदत
निसर्ग चक्रीवादळाने दापोली तालुक्यातील गावामधील नुकसान ग्रस्त भागात घराचे पूर्ण पणे कौले पत्रे उध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे सहकार्यातुन व ‘नाम’ फाऊंडेशनचे विश्वस्त व माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर इंद्रजित देशमुख, नाम फौंडेशनचे गणेश थोरात व सेवायोग प्रतिष्ठान कराडचे सचिव प्रमोद जाधव यांचे नियोजनातून दापोली तालुक्यातील (ईळने, माळवी,उंबरशेत, उटंबर, आतागाव, पाडले ,आडे, करंजानी,पिसई, शीरखल, वांझलोळी, सुकोंडी, बोरथळ, आंजर्ले, दाभिळ, आंबवली, रोवले, ओणनवसे) १७ गावातील ७२ गरजू विधवा,अपंग,निराधार कुटूंबाना १२०० जीआईचे पत्रे वाटप करण्यात आले.
www.konkantoday.com