भारतीय रेल्वेने तब्बल २.८ किलोमीटर लांबीची आणि तब्बल २५१ डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा केला विक्रम
आजवर तुम्ही किती लांबीची आणि किती व्हॅगन्सची ट्रेन पाहिलीय. साधारणपणे आपण जास्तीत जास्त ३० ते ४० डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल २.८ किलोमीटर लांबीची आणि तब्बल २५१ डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. सुपर पायथन ‘शेषनाग’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या.
तब्बल २५१ डबे, व्हॅगन, ४ ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोको (इंजिन ) या खास ट्रेनला जोडण्यात आले होते. मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे २२किलोमीटरचे अंतर ४५मिनिटात पूर्ण केले.
www.konkantoday.com