बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन
बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे १.५२ वाजता हृदयविकारामुळे मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या अस्वस्थ होत्या, त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांची तब्येत खालावली आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांना २० जून रोजी गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याची कोविड टेस्ट झाली होती, जी निगेटिव्ह आली होती. सरोज खानच्या कुटूंबियांनी सांगितले की, त्यांच्या तब्येतीत हळू हळू सुधारणा होत होती. त्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता.
www.konkantoday.com