महावितरण गंभीर आर्थिक संकटात त्यामुळे तत्काळ १० हजार कोटी रुपयांची मदत मिळावी-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडलं आहे. त्यामुळे तत्काळ १०हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांना केली आहे . याबाबत त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मागणी केली.
नितीन राऊत यांनी या पत्रात म्हटलं, ‘राज्यात मागील 3 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणला फार मोठ्या व अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या काळात राज्यातील बहुतांश उद्योगधंदे व व्यवसाय बंद राहिले.त्यामुळे त्यातून मिळणारा महसूल ठप्प झाला. शेतीपंपाना आणि घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन दिल्याने प्रचंड आर्थिक तूट निर्माण झाली आहे
www.konkantoday.com