
कोरोनासंदर्भात सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण-चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचे सहकारी पक्षच प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोरोनासंदर्भात सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पुण्यात अर्ध्या तासात चाचणी होते. पण संपूर्ण महाराष्ट्रात ही पद्धत वापरली जात नाही.बाहेरून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्याबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळे नियम आहेत. यामध्ये समान धोरण असायला हवं, असं पाटील म्हणाले.
www.konkantoday.com