
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच वालावलकर रूग्णालय येथील ई.एन.टी. विभागात स्लीप लॅब उपलब्ध
श्री विठ्ठलराव जोजी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित भ. क. ल. वालावलकर रूग्णालय येथील ई.एन.टी. विभागात स्लीप लॅब नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. स्लीप लॅब ही फिलिप्स कंपनीची अतिशय उच्च दर्जाची स्लीप लॅब आहे.आपण घोरण्याच्या समस्येने हैराण आहात का? रात्री झोपेत घोरणे ही केवळ एक समस्या नसून हा अनेक मोठ्या रोगांना प्रोत्साहन देणारा त्रास आहे. आजकालच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण दुर्लक्षित करणारी गोष्ट म्हणजे पुरेशी शांत झोप आणि हिच शांत झोप न लागण्याचे कारण म्हणजेच श्वास बंद होणे, जोडीदाराचे घोरणे व रात्री चालू असलेले विविध आवाज, आपल्याला जर पुरेशी ६-७ तासांची शांत झोप मिळाली नाही तर मग ते इतर मोठ्या रोगांना प्रोत्साहन देतात. पण बर्याचदा आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्याला झोपेमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? दिवसभरात खूप झोप येण्याचे कारण काय? आणि याच गोष्टीचे निदान होणे गरजेचे आहे. हे निदान करण्यासाठी अद्यावत स्लीप स्टडी करावी लागते. या स्लीप स्टडीमध्ये श्वासामुळे, मेंदुमुळे, हृदयामुळे, पोटाच्या घेरामुळे होणारा घोरण्याचा त्रास यांचे निदान करता येते. स्लीप स्टडीची अद्ययावत सुविधा कोकणामध्ये फक्त वालावलकर रूग्णालयात उपलब्ध आहे. www.konkantoday.com