कोकण रेल्वेने उभारल वीस बेडचे क्वारंटाइन सेंटर
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोकण रेल्वेने देखील आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.कोकण रेल्वेने त्यांच्या रत्नागिरी स्थानकात वीस बेडचे क्वारंटाइन सेंटर उभारले आहे.मध्यंतरी कोकण रेल्वेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.त्यानंतर कोकण रेल्वेच्या पन्नास कर्मचाऱ्यांचे स्वॅब टेस्टिंग करण्यात आले होते.हे सर्व स्वॅब निगेटिव आले होते.आता खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेकडून क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे.
www.konkantoday.com