
चिपळूण शहरातील नारायण तलाव परिसर बनला मद्यपींनी बनवला अड्डा
चिपळूण शहरातील नारायण तलावाच्या बागेला मद्यपींनी आपला अड्डा बनविला आहे. या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी होते. त्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतो, असे असतानाही पोलीस किंवा नगर पालिका प्रशासन कारवाई करण्याबाबत उदासीन असल्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या मद्यपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. www.konkantoday.com