
काेराेनाच्या महत्वाच्या वेळी सिव्हिलमधील रिक्त पदे असताना जिल्हा शल्यचिकित्सकाना सक्तीच्या रजेवर पाठविणार?
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील (सिव्हिल) वर्ग १ ते ४ मधील रिक्त असलेली पदे असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे कळते.सिव्हिलमध्ये वर्ग १ ची ३१ डॉक्टरांची पदे मंजूर असताना सध्या फक्त ६ डॉक्टर कार्यरत आहेत. एमबीबीएस डॉक्टरांनी सिव्हिलकडे पाठ फिरवली आहे. परिचारिकांच्या २७ जागांसाठी मुलाखती प्रक्रिया पूर्ण झाली. मुलाखतीला आलेल्या १० पैकी ९ परिचारिका सिव्हिलमध्ये रूजू झाल्या असून उर्वरित पदे अद्यापही रिक्त आहेत. एनआरएचएम अंतर्गत १५ डॉक्टरना नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी फक्त सहा डॉक्टर हजर झाले आहेत. सिव्हिलमध्ये एकही तज्ञ डॉक्टर येण्यास राजी होत नाही. डॉ. प्रकाश जांभुळकर यांची नियुक्ती कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉ. जांभुळकर यांच्याकडे सिव्हिलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सिव्हिलमधील अतिदक्षता विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी एका खाजगी डॉक्टरकडे सोपविण्यात आली आहे.
konkantoday.com