कोरोनामुळे इतिहासात प्रथमच पंढरीची आषाढीवारी खंडीत झाली आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा थांबल्याने समस्त वारकऱ्यांच्या मनाला एक सल लागून राहिली आहे. मात्र, यंदाची वारीला जाता न आल्याचे दु:ख अनेकांनी वेगळ्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाचप्रकारे गवाणे (ता. देवगड) गावचा हरहुन्नरी यूवा चित्रकार अक्षय मेस्त्रीने गावातल्याf दीड एकर भोंड्या माळरानावरील गवत आकर्षकरित्या कातरून तब्बल ३४० फूट उंचीची सुंदर, मनमोहक पांडुरंगाची ‘गवत’प्रतिमा साकारली आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या गवाणे (ता. देवगड) गावचा हरहुन्नरी यूवा चित्रकार अक्षय मेस्त्रीने तब्बल ३४० फूट...