
लग्न ठरले नाही म्हणून तरूणाची आत्महत्या
रत्नागिरी शहरातील मिरजोळे पाडावेवाडीत राहणारा मिलिंद भिकाजी पाडावे या ३१ वर्षाच्या युवकाने लग्न जमले नाही म्हणून विष पिऊन आत्महत्या केली. मिलिंद याचे गेले चार वर्षापासून लग्न ठरत नव्हते. त्यासाठी तो प्रयत्न करत होता परंतु लग्न न ठरल्याने निराश होवून त्याने २४ तारखेला घरातील रेटॉल हे विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते परंतु तेथे उपचाराच्या दरम्याने निधन झाले.
www.konkantoday.com