आडिवरेतील देवी महाकालीचा उद्यापासून नवरात्रोत्सव


राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (१५ ऑक्टोबर) घटस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे.उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून आडिवरेतील श्री महाकालीची सर्वदूर ख्याती आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून सज्जता करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button