लॉकडाऊनमुळे गॅस एजन्सी समोर गर्दी उसळली
उद्यापासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने गॅस सिलिंडर मिळणार की नाही या भीतीने लोकांनी जयस्तंभ येथील विजय गॅस एजन्सीसमोर मोठी गॅस सिलिंडरसाठी गर्दी केली होती. लोकांनी स्कूटरसह, वाहने त्या ठिकाणी आणल्याने ट्रॅफिकही जॅम झाले होते. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला तर काही स्कूटर खड्ड्यात अडकल्यामुळे बाजूला कलंडल्या.
www.konkantoday.com