
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची महावितरण कार्यालयावर धडक
महावितरणाचे तीन ते चार महिन्यांची बिले एकदम भरमसाठ आली असल्यामुळे आमदार डॉ.राजन साळवी यानी महावितरण कार्यालयावर काल धडक मारली.राजापूर तालुका पंचायत समिती येथे महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता श्री. अनिलकुमार डोंगरे यांचेकडे महावितरण च्या अनेक प्रश्नांबात आढावा घेतला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक डाउन च्या काळात महावितरणाचे तीन ते चार महिन्यांची बिलेएकदम भरमसाठ आली असल्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी महावितरण अधीक्षक अभियंता श्री.सायनेकर तसेच कार्यकारी अभियंता श्री.बेले यांची भेट घेऊन या समस्याबाबत जाब विचारला त्यावेळी अनेक तक्रारदार उपस्थित होते.
त्यावेळी महावितरण अधीक्षक अभियंता श्री.सायनेकर यांनी त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे *आश्वासन दिले. त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर, राकेश नागवेकर, माजी जिल्हापरिषद शिक्षण सभापती दीपक नागले, रिक्षा संघटना उप जिल्हा संघटक अविनाश कदम, शरद राणे, हरीचंद्र शेडेकर, पाटील मॅडम, वीज ग्राहक उपस्थित होते.
www.konkantoday.com