रत्नागिरी शहरातील ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा केवळ रेव्हिन्यू कलेक्शन साठी ? अॅड.दीपक पटवर्धन

0
46

रत्नागिरी शहरात ट्रॅफिक यंत्रणा ही केवळ हेल्मेट नसलेल्यांना दंड लावण्यासाठी आहे का ? हा प्रश्न जनतेला पडत आहे. कोरोना लॉकडाऊन काळातही कोटी दीड कोटीचा दंड वसुल झाला अशी बातमी ही झळकली होती. शहरामध्ये बाजारपेठांमध्ये अस्ताव्यस्त बेशिस्तीत पार्क केलेल्या गाड्या, नाक्यांमध्ये वहानांच्या गर्दीने अडणार ट्रॅफिक, मोक्याच्या दुकानांसमोर बेशिस्तीत उभी केलेली वाहने, रिक्षा या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम यंत्रणेने करायचे नाही असेच जणू काही चित्र आहे. हेल्मेट अत्यावश्यक ही कायद्यातील एकमेव तरतूद आहे आणि त्या तरतुदीची अंमलबजावणी सुरु आहे असे चित्र आहे अशी उपरोधीक टिका अॅड.दीपक पटवर्धन यांनी केली.
पार्किंग, गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, विशिष्ट दुकानांसमोर थांबलेली वाहने यामुळे खूप अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या संदर्भाने लवकरच जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेवून याबाबत निवेदन त्यांना सादर करण्यात येईल आणि रत्नागिरी शहरातील ट्रॅफिकवर योग्य नियंत्रण ठेवून वाहतूक कोंडी अनियमित पार्किंग हे प्रश्न निकाली काढावेत अशी मागणी करण्यात येईल अशी माहिती अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here