गुहागर आगारातील एसटी कर्मचार्यांना १० दिवसांचाच पगार, आगार व्यवस्थापकांना घेराव
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांना मे महिन्याचा पगार ५० टक्केच देण्याचा निर्णय झाला परंतु त्यातही गुहागर आगारातील कर्मचार्यांना फक्त १० दिवसांचा पगार देण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये संतप्त भावना आहे. या प्रकाराबाबत शनिवारी दुपारी गुहागर आगारातील सुमारे दोनशे कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापकांना घेराव घालत याचा जाब विचारला. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे? आम्ही आत्महत्या करावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे का? असा संतापजनक सवाल कर्मचार्यांनी केला आहे.
www.konkantoday.com