सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मनाई
सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य जिल्हा आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भुरळ देशातील पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकांनाही पडते. पावसाळा म्हणजे सिंधुदुर्गच्या निसर्ग सौंदर्यात अजून भर पडते. याचमुळे जिल्ह्यातील आंबोली, सावडाव आदी धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बंदी घातली आहे. तसे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले असून बंदी आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
www.konkantoday.com