रविवार २८ जून रोजी भा.ज.पा आयोजित व्हर्चूअल रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, देवेंद्रजी फडणवीस संबोधित करणार ; रत्नागिरीकरांनी या व्हर्चूअल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – अॅड. दीपक पटवर्धन
भा.ज.पा केंद्र सरकारच्या प्रथम वर्ष परिपूर्ती निमित्ताने विशेष संपर्क अभियान राबवत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर जल्लोषी कार्यक्रम न करता कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य केले. आता पुढील टप्यात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत भा.ज.पा व्हर्चूअल रॅलीचे माध्यमातून जनसंपर्क करीत आहे.
दि.२८ जून २०२०, रविवार रोजी सायंकाळी ६.३० वा. युट्यूब, फेसबुक लाइव्ह, वेबेक्स मीट अॅप, काही चॅनल्सच्या माध्यमातून व्हर्चूअल रॅलीमध्ये जनतेला जोडण्याचे अभियान सुरु आहे. उद्याची रॅली ही कोकण विभागाची रॅली असून केंद्रीय मंत्री मा.स्मृती इराणी या प्रमुख वक्त्या म्हणून रॅलीला संबोधित करतील. ना.देवेंद्र फडणवीस, आ.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे ही या व्हर्चूअल रॅलीला संबोधित करतील. भा.ज.पा चे कोकणातील लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघातून सदर रॅलीजवळ जोडलेले असतील. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात ५ मंडलामध्ये या व्हर्चूअल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी स्वंतंत्र योजना करण्यात आली आहे. जनतेने या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी युट्यूब, फेसबुक लाइव्ह, वेबेक्स मीट अॅप यांचा वापर करून रॅलीला कनेक्ट व्हावे असे आवाहन रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, लांज्याचे अध्यक्ष मुन्ना खामकर, राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहर अध्यक्ष सचिन करमरकर हे आपापल्या क्षेत्रात व्हर्चुअल रॅलीचे कार्यक्रम करतील.
नविन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सुरु असलेले हे अभियान लोकप्रीय होत असून या व्हर्चुअल रॅलीमध्ये किमान ३० लाख लोक डीजीटल माध्यमातून सहभागी होतील असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण व्हर्चुअल रॅलीचे आयोजनाची जबाबदारी आ. प्रसादजी लाड यांच्यावर असून कोकण विभागाचा दौरा करत आज आ. प्रसादजी लाड सिंधुदूर्गात पोहोचत आहेत.