वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे -ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0
40

वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे आणि महावितरणचे संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू यांना दिले.लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here