मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान १ हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही.
www.konkantoday.com