आंबडस येथे बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला
चिपळूण तालुक्यातील पाली येथे नदीपात्रात पीर लोटे येथील सुरज दिलीप पाटील (२९) याचा मृतदेह आढळून आला. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपासासाठी खेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पालीचे पोलीस पाटील राजेंद्र गंगाराम महाडीक यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली. सुरज पाटील (२९) रा. पीरलोटे हा आंबडस उंब्रवणे डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. त्यातच पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. या वेळी ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अखेर खेड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. अखेर काल त्याचा मृतदेह पाली येथे आढळून आला. पाटील लोटे येथे एका कंपनीत कामाला होता.
www.konkantoday.com