
जिल्हाधिकार्यांचा बंदी आदेश मोडून राखण देण्यासाठी निघालेल्या शंभर ते सव्वाशे ग्रामस्थांवर गुन्हा दाखल, संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील घटना
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश घातला असताना देखील तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जिल्ह्यामध्ये सभा सार्वजनिक, खाजगी कार्यक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व धार्मिक कार्यक्रमांवर ३१.६.२०२० पर्यंत बंदी आदेश घातला असताना देखील बुरंबाड गावची ग्रामदेवता वरदाईनी देवीची सालाबादप्रमाणे वार्षिक राखण नवीनी (तिरका) देण्यासाठी वरदाईनी देवी मंदिर ते बुरबांड गावचे सीमीवर जात असताना आत्माराम कुळये, रमेश गुरव, प्रदीप गुरव, घनश्याम कवळकर, सुभाष कुंभार आदी शंभर ते सव्वाशे लोकांचा जमाव विष्णूवाडी या ठिकाणी जमला होता. अनेकांनी त्यावेळी मास्क लावण्याचे सक्तीचे हाेते. यामुळे मनाई हुकूम मोडल्याबद्दल या सर्वांविरूद्ध संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com