
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत एक महिन्याने वाढविली
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्र शासनाने बुधवारी केली. कर भरणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची नवी तारीख आता ३१ जुलै २०२० असणार आहे. दरम्यान, केंद्राकडून यापूर्वीच आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआर भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहेत्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.
www.konkantoday.com