बेकायदा वाळू उपसा त्वरित बंद करा, कोंडिवली ग्रामस्थांची मागणी, तहसिलदारांना निवेदन
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील कोंडिवली गावामध्ये बेकायदा वाळूचे उत्खनन केले जात असल्याची तक्रार कोंडिवली तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तहसिलदार यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोंडिवली गावामध्ये बेकायदा वाळू उपसा केला जातो. आम्ही कोंडिवली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ याच ठिकाणी शिंपल्या वेचण्याचा तर मच्छिमारी करून उपजिविका करीत असतो. या रेती उत्खननामुळे आमची उपासमार होत असून आम्ही ग्रामस्थ येथून शेती कामासाठी जरी ये-जा करीत असलो तरी हे वाळूमाफिया आम्हाला धमकावत असल्याची तक्रार या निवेदनात केली आहे.
www.konkantoday.com