पीएम केअर्स फंडातून सर्वाधिक १८१ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला
पीएम केअर्स फंडातून सर्वाधिक १८१ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली.लोकसंख्या आणि कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन सर्व राज्यांसाठी प्रमाण ठरविण्यात आले आणि त्यानुसारच निधीचे वाटप करण्यात आले. संशयित आणि बाधितांना अन्न व निवारा तसेच वैद्यकीय उपचार आणि स्थलांतर या उद्देशांसाठी हा निधी देण्यात आला. उत्तर प्रदेशला १०३कोटी, तामिळनाडूस ८३ कोटी, गुजरात ६६ कोटी, दिल्ली ५५कोटी, राजस्थान ५० कोटी आणि कर्नाटकला ३४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
www.konkantoday.com