देवरूख नगरपंचायत पाण्यासाठी मलकापूर पॅटर्न वापरणार

देवरूख ः सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषद ही देशातील पहिली नगर परिषद आहे की जी नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करते. त्याच धर्तीवर देवरूख ग्रामपंचायत मलकापूर पॅटर्न राबवून देवरुखकरांना २४ तास पाणी देण्याचा निर्धार देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेटे यांनी केला आहे. नुकताच देवरूख ग्रामपंचायतीचे नगराध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य विविध भागात विकास दौर्‍यावर आहेत. त्यावेळी ज्या भागात चांगल्या योजना राबविल्या आहेत. त्यांची माहिती घेवून या योजना आपल्या ठिकाणी कशा राबविता येतील याचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरणामार्फत लोकसहभागातून विकासाकडे याद्वारे १४ कोटी ३० लाख रुपयांची पाणी योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेद्वारे तेथील नागरिकांना ते २४ तास पाणीपुरवठा करीत आहेत. देवरूख नगर पंचायतीची लोकसंख्या १७ हजार असून पाणीपट्टीधारकांची संख्या २०३० आहे. यामुळे अशा प्रकारे योजना या ठिकाणी राबविण्याच्यादृष्टीने लवकरच सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button