जि.प. अधिकार्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेला सव्वा नऊ कोटी रुपयांचा निधी अखर्चित
रत्नागिरी परिषद भवनातील वरिष्ठ अधिकारी, खाते प्रमुखांच्या नकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेल्यांपैकी ९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. सदरचा निधी शासनाकडे परत गेल्यास विकासाच्या प्रक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत पालकमंत्री ना. अनिल परब कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com