
सरकार आणि शिवसेना खंबीर असल्याने तुमचे मोडून पडलेले संसार पुन्हा उभे करु-आमदार योगेश कदम
नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाचा दापोली आणि मंडणगड तालुक्याला फार मोठा फटका बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे वादळामुळे उद्धवस्त झाली आहेत. वादळाच्या तडाख्याने वीजवितरण व्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली असल्याने या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे दहा दिवसांनंतरही अंधारात आहेत. या दोन्ही तालुक्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र सरकार आणि शिवसेना खंबीर असल्याने तुमचे मोडून पडलेले संसार पुन्हा उभे केले जातील हा विश्वास ठेवा अशा शब्दात दापोली-खेड-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे.
www.konkantoday.com