केशकर्तनालय व पार्लरना दिलासा मिळणार, लवकरच सुरू होणार सलून, ब्युटी पार्लर -विजय वडेट्टीवार
टाळेबंदीमुळे केशकर्तनालय व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच केशकर्तनालय व पार्लर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. परंतु सलून सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com