सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात २९. ५३ चौ.कि.मी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात २९. ५३चौ.कि.मी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसुचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेबुवारी महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा केली होती. वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझमचा प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आता हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित झाले आहे.
www.konkantoday.com