
तुळसवडे येथील सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी पाचजणांना अटक
राजापूर तालुक्यातील तुळसवडे येथील खूनप्रकरणी राजापूर पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान या पाचही जणांना येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील देवगडमध्ये लॉंचवर खलाशी म्हणून काम करणार्या तुळसवडे घुमेवाडी येथील बुधाजी गोविंद तोसकर यांचा रविवारी रात्री खून झाला होता. वडिलोपार्जित शेतजमिनीवरून बुधाजी व त्याच्या भावाचे कौटुंबिक वाद सुरू होता. त्यातूनच बुधाजीचा खून झाल्याचा संशय आहे. आरोपींनी लाठ्या काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी बुधाजीला जबर मारहाण केली होती. त्यातच त्याचा अंत झाला होता.
मेघना मंगेश तोसकर, चंद्रभागा चंद्रकांत तोसकर, वैष्णवी विश्वास तोसकर व कु. मिनाक्षी चंद्रकांत तोसकर यांना या खूनाला जबाबदार धरून अटक केली होती.
www.konkantoday.com