नागोठणे रिलायन्स टाऊनशिप मधिल काही भाग करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित
अलिबाग (राजेश बाष्टे) -रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नागोठणे रिलायन्स टाऊनशिप येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले नागोठणे रिलायन्स टाऊनशिप, ता.पेण येथील बी-150 मधील रुम नं.बी-149 ते बी-152 रुम पर्यंतचे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
www.konkantoday.com