शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिना निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना, शिवसेना नेते व मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वंदन केलं आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील, असा विश्वास वाटतो. वर्धापनदिनाच्या सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा…
www.konkantoday.com