सासरी आलेल्या तरूणाचे इमारतीवरून पडल्याने निधन

0
145

चिपळूण तालुक्यातील ओमळी पवारवाडी येथील किरण पवार या २२ वर्षीय तरूणाचे १६ जून रोजी खेर्डी शिगवणवाडी येथे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून पडून निधन झाले.
किरण खेर्डी शिगवणवाडीतील दत्त प्लाझा इमारतीत आपल्या सासुरवाडीमध्ये आला होता. यावेळी तो गॅलरीमध्ये आपला रेनकोट सुकविण्यासाठी स्टूलवर चढला व स्टूलसह खाली असलेल्या सिमेंटच्या पत्र्यावर कोसळला. यावेळी पत्रा तुटल्याने पत्र्यासह तो इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पार्किंगमध्ये पडला. त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने अतिरिक्त स्त्राव होवून त्याचे निधन झाले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here