
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे महाराष्ट्रातील हजारो पोलिसांचे मनोबल वाढविले
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱयांचा माेबाईलवरआज एक कॉल आला, ‘हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, कसे आहात, कोरोना काळात तुम्ही सर्वांनी चांगली ड्युटी केली, स्वत:ची काळजी घ्या’ या वाक्याने कर्मचारीही भारावून गेले. सुरूवातीला कर्मचारीही भांबावले गृहमंत्र्यांचा कॉल कसा असेल पण हा कॉल जरी थेट नसला तरी रेकॉडिंग केलेला होता, एकावेळी सर्वांशी बोलणे शक्य नसल्याने गृहमंत्री देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे संवाद साधला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे महाराष्ट्रातील हजारो पोलिसांचे मनोबल वाढविणारा संदेश दिला., हा अनुभव आमच्यासाठी वेगळा असल्याची भावना पोलीस कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com