बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता
राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली. इयत्ता बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
‘लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाला. तर पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. आमचा प्रयत्न होता लवकरात लवकर निकाल लावण्याचा, मात्र तरीदेखील बारावीचा निकाल जुलै १५ पर्यंत आणि दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो, पेपर तपासणीचं काम सध्या सुरु आहे.
www.konkantoday.com