नव्या फायर फायटरमुळे भाजप व महाविकास आघाडीत श्रेयावरून राजकीय आग भडकली
चिपळूण पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवा अत्याधुनिक फायर फायटर दाखला झाला आहे. हा फायटर आल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याच्या श्रेयावरून भाजप व महाविकास आघाडी यांच्यात राजकीय आग भडकली आहे. भाजपने आपल्या काही सदस्यांना बरोबर घेवून या फायर फायटरचे लोकार्पण केले. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सदस्याना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या महाविकास आघाडीने या फायर फायटरचे दुसर्या दिवशी लोकार्पण कार्यक्रम परत एकदा साजरा केला. पालिकेत महाविकास आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येने असल्यामुळे आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, सर्वांनी यासाठी प्रयत्न केले, फायटर सर्वांसाठी आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शहरप्रमुख व मागासवर्ग सभापती उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com