अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भवितव्य जपले जाईल -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतीत जे अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे त्या बद्दल बोलताना उच्च तंत्र शिक्षण मंत्रि उदय सांमत म्हणाले, महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भवितव्य जपले जाईल व त्यांच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नाही या दृष्टिकोनातून शासन योग्यते अंतिम निर्णय घेतले जातील. .
याबाबत वेगवेगळे विधाने करून कुणीही संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये असे सांगून ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये.
विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय शासन घेईल. लवकरच याबद्दल अधिकृत माहिती दिली जाईल अशी पुष्टीही सामंत यांनी जोडली.
www.konkantoday.com