
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याना जोडणारा खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळली
रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याना जोडणारा खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला हाेता. काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील परंतु दळणवळणाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याशी संबंधित असलेल्या २१ गावांचा रत्नागिरीशी असलेला संपर्क तुटला.
खेड तालुक्यातील खोपी गावापासून काही अंतरावर असलेला रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याना जोडणारा दुवा आहे.
www.konkantoday.com