रत्नागिरी जिल्ह्यात 16 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,एका रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 14–रत्नागिरी येथे स्वॅब तपासणीस आलेल्या 8 रुग्णांचे अहवाल दिवसभरात पॉझिटिव्ह आले त्यामुळे कालपासून पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या 16 झाली तर एकूण संख्या 418 झाली तर कालपासून बरे झाल्याने घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 12 आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 291 झाली. एका 67 वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला मृतांची संख्या आता 17 झाली आहे.
24 तासात पॉझिटिव्ह आलेल्यांचे विवरण असे रत्नागिरी 10, संगमेश्वर 2, कळंबणी 2, राजापूर 1 आणि कामथे 1 (एकूण 16).
24 तासात बरे झालेल्यांचे विवरण असे सीसीसी पेढांबे 5, जिल्हा रुग्णालय 1, वेळणेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा लोटे 2 आणि कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2.
मुंबई येथून आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील निकूरवाडी येथील एका रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला या 67 वर्षीय रुग्णास उच्च रक्तदाब व मधुमेह देखील होता त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्चा आता 17 झाली आहे.
आज सायंकाळची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह 418
एकूण कोरोनामुक्त 291
मृत्यू 17
एकूण एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 110
पैकी रुग्णालयात दाखल 100
पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हा रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 06 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 08 गावांमध्ये, दापोली मध्ये 9 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 17, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 3, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 8, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -3 असे एकूण 38 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाईनची संख्या 475 ने कमी
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 52 हजार 356 इतकी आहे.
आत्तापर्यंत 6 हजार 600 अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 506 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 136 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 418 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 697 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 370 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 370 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 216 अहवाल मिरज आणि 150 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.