देवगड (सिंधुदुर्ग) येथे मच्छीमारी करताना जाळ्यात अडकलेल्या एका मोठ्या कासवाची तारामुंबरी येथील मच्छिमारांनी सुखरूप सुटका केली. कासवाचे सुमारे दाेनशे किलो वजन असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली.तारामुंबरी येथील मच्छीमार अक्षय खवळे, दीपक खवळे, ज्ञानेश्वर सारंग, पंकज दुधवडकर व हितेश खवळे आदी तारामुंबरी खाडीत शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मच्छीमारी करीत होते. मच्छीमारी करताना त्यांच्या जाळ्यात मोठे कासव अडकले. त्यांनी कासवाला होडीत घेवून जाळ्यातुन त्याची प्रथम सुटका केली. त्यानंतर कासवाला तारामुंबरी खाडीकिनारी आणले.
त्यानंतर कासवाला तारामुंबरी समुद्रात सोडण्यात आले
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या मच्छीमारी करताना जाळ्यात अडकलेल्या एका मोठ्या कासवाची तारामुंबरी येथील मच्छिमारांनी सुखरूप सुटका