
पेटीएम अकाऊंटचे केवायसी केले नाही असे सांगून ओटीपी नंबर घेवून ८० हजारांची फसवणूक
रत्नागिरी मजगांव येथे राहणारे रमाकांत रामचंद्र केळकर यांना अमिषकुमार नावाच्या इसमाने फोन करून अकाऊंटचे केवासी केले नाही असे सांगून त्यांच्या क्रेडीट कार्डचा ओटीपी नंबर घेवून सुमारे ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील रमाकांत केळकर हे मजगांव येथे राहतात. त्यांच्या मोबाईलवर मनिषकुमार असे नाव सांगणार्या अनोळखी इसमाने फोन करून तुमचे पेटीएम अकाऊंटचे केवायसी केले नसल्याने अकाऊंट सील करण्यात येईल असे सांगितले. व केळकर यांच्याकडील समोरील इसमाने त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून घेतली. तसेच ऍक्सीस बँक व युनियन बँकेच्या डेबीट कार्डचे नंबर घेवून त्यावर आलेले ओटीपी नंबर घेतले त्याचा नंबर घेवून फिर्यादीच्या खात्यावरून ८० हजार रुपये काढून घेवून फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com