निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरीत

रत्नागिरी दि. 13 : जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17 जुन 2020 रोजी सकाळी 09.00 वाजता महाड येथून मंडणगडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता मंडणगड, जि. रत्नागिरी येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता आंबडवे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.00 वाजता शिगवण येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सकाळी 11.55 वाजता केळशी येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 12.30 वाजता आडे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 01.10 वाजता पाजपंढारी येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 01.50 वाजता दापोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.50 वाजता दापोली येथून मुरुड, दापोली कडे प्रयाण. दुपारी 03.05 वाजता मुरुड येथे आगमन व नुकसानीची पहाणी. दुपारी 03.35 वाजता कर्दे येथे आगमन व नुकसानीची पहाणी. सायंकाळी 04.30 दापोली येथे आगमन व जिल्हाधिकारी यांचे सादरीकरण. दापोली येथे राखीव व मुक्काम. गुरुवार 18 जुन 2020 रोजी सकाळी 09.00 वाजता दापोली,जि. रत्नागिरी येथून मांडवा जेट्टी जि. रायगड कडे प्रयाण. या दौऱ्यामुध्ये केंद्रीय पथकाचे प्रमुख श्री. रमेश कुमार गांता (भाप्रसे), सहसचिव,(ॲडमिनीस्ट्रशन आणि सीबीटी)एनडीएमए, एमएचए, नवी दिल्ली असून त्यांच्यासोबत श्री. आर.बी. कौल,सल्लागार, वित्त मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली, श्री. एन.आर.एल.के. प्रसाद,संचालक, ऊर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली, श्री.एस.एस.मोदी, उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली, श्री. आर.पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, श्री. आंशुमली श्रीवास्तव, मुख्य अभियंता, विभागीय कार्यालय, रस्ता वाहतूक मार्ग विभाग, मुंबई हे पथकात असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button